उस्मानाबाद/तेरणेचा छावा :-
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना आजाराचे सावट आहे. राज्य सरकार व प्रशासन यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर खूप अत्यावश्यक झाले आहे. त्यात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जवळपास कोणत्या हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड व इतर सेवा उपलब्ध आहेत हे लवकर माहित होत नाही, त्यामुळे कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रुग्णांच्या सेवेसाठी सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणाऱ्या विवेकानंद मंडळांने पुढाकार घेतला असून यांच्या माध्यमातून आजवर ५००० वर रुग्णांना सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विवेकानंद युवा मंडळाचे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक कोवीड हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. रुग्ण कुठे आहे त्या भागात मंडळ आपल्या कार्यकर्त्यांद्वारे त्यांच्यासाठी बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत करत आहे. व्हि.वाय.एम. कोवीड हेल्पलाइनच्या माध्यमातून विवेकानंद युवा मंडळ रुग्णांसाठी सर्वतोपरी व शक्य तिथे उपस्थित राहून कार्य करत आहे. मंडळाचे राज्य सचिव महेंद्रप्रताप जाधव यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या व्हि.वाय.एम. हेल्पलाईनचा अनेक हजारो रुग्णांना फायदा झाला आहे. सध्या लाभ मिळालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६३३ आहे. अगदी पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर पासून गडचिरोली पर्यंत मंडळाचे नेटवर्क तयार असून यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खूप मदत मिळत आहे. या कार्यासाठी राज्य आरोग्य विभाग, पोलिस संचनालय, नगरपरिषद प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, डॉक्टर्स विंग, मेडिकल कौन्सिल यांनी मंडळाचा गौरव केला आहे व पुढील वैद्यकीय कार्यात सहकार्य देखील करत आहेत. रुग्णांना मदत केल्यानंतर त्यांचे नातेवाईक देखील या व्हि.वाय.एम. कोवीड हेल्पलाइन मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्य करत आहेत. "हेच या कार्यासाठी खूप मोठे प्रोत्साहन असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके यांनी सांगितले." या उपक्रमासाठी मंडळाच्या डॉक्टर्स विंगचे पदाधिकारी-कर्मचारी, राज्य समन्वयक स्वप्नील देशमुख, क्रांतिसिंह काकडे, समर्थ शिरसीकर, शुभम मगर, केतन जाधव, प्रतिक मगर, सुमित जानराव, रोहन गाढवे, डॉ.किशोर ठाकर, डॉ.अमित ठाकर, परिचारिका आज्ञाताई पाटील, विश्वास पाटोदेकर, जयचंद्र समासे व आदी कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले, मंडळाच्या कार्याचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.
0 Comments