Subscribe Us

आज दुपारी १:३० वा.देशातील पहिला धाराशिव साखर कारखान्याने इथेलॉन प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवरांकडून शुभारंभ.


उस्मानाबाद/तेरणेचा छावा:- 
देशातील पहिला धाराशिव साखर कारखान्याने इथेलॉन प्रकल्पातून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 14 मे रोजी दुपारी १:३० वाजता मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आरोग्यमंत्री  श्री राजेश टोपे ,पालकमंत्री शंकरराव गडाख ,खा.ओमराजे निंबाळकर आ.कैलास दादा पाटील आमदार सुभाष बापू देशमुख जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर , मौज इंजिनिअरचे ओक यांच्या व्हर्च्युअल मीटिंग द्वारे होणार असल्याची माहिती धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी तेरणेचा छावाशी बोलताना सांगितले.
    कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी असून ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढत खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी केलेल्या आवाहानाला उस्फुर्त प्रतिसाद देत धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरिंग पुणे याच्या तांत्रिक साहय्याने ऑक्सिजन निर्मिती करण्याचे धाडस दाखवून रात्र-दिवस काम सुरू ठेऊन अठरा दिवसातच प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यात आले. 
   त्यामध्ये उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी, यांच्यासह सहकार्याने या प्रकल्पात मदतीचा हातभार लावला आणि हा प्रकल्प पुर्णतः करण्यात आला. 
   धाराशिव साखर कारखान्यात प्रत्यक्षात ऑक्सिजन निर्मितीस प्रारंभ झाला असुन ऑक्सिजनची शुद्धता तपासणासाठी मुंबई च्या लॅब मधे तीन बबल पाठविण्यात आले होते, लॅबने तपासणी करून  प्रकल्पास मान्यता दिली आहे.        
       अगदी कमी कालावधीत ऑक्सिजन निर्मिती करुन धाराशिव साखर कारखान्याने साखर कारखानदारीत प्रेरणा घेणारा आर्दश निर्माण केला आहे. 
     कोरोना संकटापासुन लोकांचे जीव वाचविण्यासाठी देशात पहिलाच साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करणारे चेअरमन अभिजीत पाटील यांनी साखर कारखानदारीत एक  प्रेरणादायी आर्दश निर्माण केला आहे.

Post a Comment

0 Comments