दहिफळ /तेरणेचा छावा:- दहिफळ ग्रामपंचायत कडून आशा कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट वाटप शुक्रवार दिनांक 7 मे रोजी करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतच्या वित्त आयोगातून फेशियल किट, मास्क हॅन्ड ग्लोज सह सुरक्षा किटचे आशा कार्यकर्त्या व ग्रामपंचायत कर्मचारी यांना वाटप करण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राच्या अनुषंगाने एखाद्या व्यक्तिचे निधन झाल्यास त्याच्या अंतिम संस्कार ची जबाबदारी ग्रामपंचायतची म्हणून पीपी किट सह संपूर्ण सुरक्षा योजना तयार करण्यात आली.
0 Comments