Subscribe Us

येरमाळा ,दुधाळवाडी येथे कोविड सेंटर उभे करण्यासाठी जागा देण्यास दुधाळ बंधूची तयारी.


येरमाळा/तेरणेचा छावा:-येडेश्वरी गुरुकुल गोशाळा येरमाळा व येडेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दुधाळवाडी येथे कोविड सेंटर उभे करण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त जागा देण्याची तयारी डॉक्टर नवनाथ दुधाळ व रंगनाथ दुधाळ या बंधूनी दाखवली आहे.
    याविषयी सविस्तर वृत्त असे की येरमाळा येडेश्वरी गुरुकुल गोशाळा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे गोशाळा व चारा छावणीची सोय करण्यात आलेली होती. निसर्गाच्या सानिध्यात व आयुर्वेदिक वनस्पती असलेल्या परिसरात सध्या या दोन्ही ठिकाणी मिळून 500 जनावरांना जगण्याचे काम केले जात आहे जनावरे दुधाळ गाई, वासरे ,बैल अशा प्रकारे गोवंशाची येथे जपणूक केली जाते.
अनेक वर्षापासून दुधाळ बंधू शासनाचे अनुदान असो वा नसो परंतु जनावरांची योग्य सोय करत आहे. यातच कोविड आजारामुळे सध्या लॉकडाऊनची परिस्थिती चालू आहे अनेक हॉस्पिटल, दवाखाने फुल असल्यामुळे अनेक कोविड रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून दुधाळ बंधूनी येरमाळा व दुधाळवाडी या गोशाळा व बहुउद्देशीय संस्थेची मुबलक जागा वीज पाणी व संडास बाथरूम सह उपलब्ध असून याठिकाणी कोविड सेंटर उभे करावे प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी असल्याचे निवेदन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे त्यांनी दिले आहे.
      शासन संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करत असतानाच स्वतःहून सर्व सोयींनीयुक्त जागा देण्याची तरी दाखविल्यामुळे प्रशासन ही या ठिकाणी परिस्थितीनुरूप निर्णय घेऊ शकते यामुळे येरमाळा व परिसरातील ५० गावांना याचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेतून दुधाळ बंधूंचे कौतुक होत आहे.

Post a Comment

3 Comments

  1. well done nana आई yedeshwari आपल्याला दीर्घ आयुष्य देऊ

    ReplyDelete