: उस्मानाबाद तेरणेचा छावा:-- पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात यावे, आढावा घ्यावा व येथील परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविणे संदर्भात प्रशासनाला निर्देश देऊन जिल्हावासियांना दिलासा द्यावा यासाठी आमचा प्रयत्न होता. याअनुषंगाने पालकमंत्री महोदयांनी आज जिल्ह्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या, यातून जिल्हावासियांना नक्कीच दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री महोदया चे आम्ही स्वागत व हार्दिक आभार व्यक्त करतो. असे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.
कोरोना मुळे उद्भवलेल्या या भयावह परिस्थिती सरकार व प्रशासनाला आमचे कायम सहकार्य राहील. या महामारीत जिल्हावासीयांना किमान मूलभूत तरी आरोग्य सुविधा मिळाव्यात, हीच आमची मागणी आहे, व या बैठकीतील निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेला निश्चितच बळ मिळेल, अशी हि अपेक्षा जिल्हाध्यक्ष काळे यांनी व्यक्त केली आहे.
कोवीड-१९ वॉर रूम मधील बैठकीमध्ये जिल्ह्यात निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थिती बाबत सविस्तर चर्चा झाली. यात सुधारणा करण्याकरिता आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने माझे सर्व मुद्दे बैठकीमध्ये मांडले. पालकमंत्री आजारी असल्यामुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊ शकले नव्हते जिल्ह्यात निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्री तात्पुरत्या स्वरूपात प्राधिकृत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. आज पालकमंत्री आल्यामुळे आरोग्य विभागाशी निगडित अनेक प्रलंबित विषय मार्गी लागतील अशी आशा आहे. पालकमंत्री महोदयांनी मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत सकारात्मकता दर्शविली आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात येऊन आढावा घेतला, प्रशासकीय यंत्रणेला योग्य ते निर्देश दिले, याबद्दल धन्यवाद!
डॉ.साहेबांचे स्नेही व आमच्या अत्यंत जवळच्या कुटुंबातील सदस्य यांचे निधन झाल्यामुळे अंतिम दर्शना साठी मला जावे लागले. माझे मुद्दे मांडून झाल्यानंतर पालकमंत्री महोदयांना कल्पना देऊन मी बैठकीतून निघालो. या मध्ये कोणीही गैरसमज करून घेऊ नयेत अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये.असे आ.राणाजगजितसिंहजी पाटील यांनी म्हटले आहे.
0 Comments