Subscribe Us

अडचण संपणार; सारोळा-मेडसिंगा रस्त्यावर दर्गाहजवळ होणार पूल. पूल उभारणीसाठी ९८ लाखाचा निधी मंजूर शेतकरी, भाविकांसह ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार.

उस्मानाबाद:/तेरणेचा छावा:- तालुक्यातील सारोळा (बुद्रूक)-मेडसिंगा रस्त्यावर बालपीर दर्गाहनजिक पुलासाठी सी.आर.आय. ए.फ योजनेतंर्गत ९७ लाख ९५ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याठिकाणी पूल उभारण्याची मागणी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे वारंवार निवेदन देवून केली होती. तसेच पालकमंत्री शंकरराव गडाख, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनीही वरष्ठि पातळीवर यासाठी पाठपुरावा केला होता. विशेषत: खा. ओमराजे निंबाळकर यांच्या विशेष पाठपुराव्या मधून हा प्रश्न मार्गी लागला आहे.
सारोळा ते मेडसिंगा रस्ता प्रवाशांसह भाविकांना अत्यंत सोयीचा आहे. संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या पंधरवाडी एकादशीला दर्शनासाठी मेडसिंगा, रूईभरसह परिसरातील गावातून भाविक तेरला याच मार्गाने मोठ्या संख्येने जातात. तसेच तीर्क्षक्षेत्र तुळजापुरलाही जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा आहे. सारोळा गावातील शेतकऱ्यांनाही शेतात जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. काही प्रमाणात रस्त्याचे डांबरीकरणही झालेले आहे. मात्र हजारो हिंदू-मुस्लीम बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रसध्दि बालपीर दर्गाहजवळून वाहणाऱ्या एका ओढ्यावर अद्याप मोठा पूल उभारण्यात आलेला नाही. पावसाळ्यात या ओढ्याला पाणी येत असल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशांचा मार्ग बंद होते. त्यामुळे या रस्त्यावर पूल उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे १ जुर्ले २०१९ रोजी निवेदनाद्वारे केली होती. तसेच यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विशेष पाठपुरावा करून सी.आर.आय. एफमधून एम.डी.आर (२०) अंतर्गत बालपीर दर्गाहजवळ पूल उभारणीसाठी ९७ लाख ९५ हजार रूपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया होवून कामास सुरूवात होणार असून शेतकरी, ग्रामस्थांसह भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री शंकरराव गडाख, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास घाडगे-पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने ग्रापं सदस्य बाकले यांनी आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments