दहिफळ/तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील कचरा व्यवस्थापन साठी घंटागाडीची सोय केली आहे.या घंटागाडचे शुक्रवार (दि. 30 एप्रिल )रोजी पूजन वसंत धोंगडे, राजेंद्र भातलवंडे, यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच चरणेश्वर पाटील, ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे, रंजीत काकडे,दगडु कांबळे, संतोष उपळकर, अनंत मते अदी उपस्थित होते.
या घंटागाडीने एक दिवसाआड प्रत्येक गल्लीतील कचरा गोळा करण्यात येणार आहे.नागरिकांनी घरातील कचरा कचराकुंडीत साठवावा.व घंटागाडी दारात आली की कचरा घंटागाडीत टाकावा.घर परिसर स्वच्छ ठेवा, यामुळे रोगराई पसरणार नाही.सुंदर गाव स्वच्छ गाव बनवू या... तुमची साथ आमचा पुढाकार..करुया गावचा विकास...असे आवाहन सरपंच चरणेश्वर पाटील.ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे यांनी केले आहे. ग्रामस्थांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालय घंटागाडी सुरू केल्यामुळे नागरिकातून विशेषतः महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments