Subscribe Us

आठवडी बाजारातील मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी काँग्रेसचे निवेदन; तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा


तेरणेचा छावा/धाराशिव:-
 धाराशिव शहरातील आठवडी बाजारात नागरिक, शेतकरी, व्यापारी व ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत  धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे (दि.09) शहराध्यक्ष धनंजय राऊत यांनी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर व  पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात आठवडी बाजार परिसरात नियमित व प्रभावी स्वच्छता, बाजारासाठी बांधण्यात आलेल्या कठड्यांचा योग्य वापर व नवीन कठडे उभारणे, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुख्य नाल्याचे काम पूर्ण करणे, संपूर्ण परिसरात प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची नियमित देखभाल, संरक्षण भिंत व मुख्य प्रवेशद्वार उभारणे तसेच ग्राहकांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला की, या मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास नागरिकांच्या हितासाठी तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, शहराध्यक्ष धनंजय राऊत यांच्यासह राजाभाऊ शेरखाने, शीला उंबरे, प्रशांत पाटील, खलील सय्यद, शिवाजी गायकवाड, मेहबूब पटेल, अग्निवेश शिंदे, वसंत मडके, दयानंद पाटील, अशोक बनसोडे, प्रभाकर लोंढे, नरसिंग पवार, अभिमान पेठे, अभिषेक बागल, अझर पठाण, सरफराज काझी, संतोष घोरपडे, पोपट शिंदे, महावीर चव्हाण, संकेत पडवळ, ॲड. जावेद काझी, विजय मुद्दे, गोरोबा झेंडे, राजेंद्र राऊत, हरिदास शिंदे, भारतराव काटे, सय्यद मन्सूर, बाबा मोमीन, चंद्रकांत जाधव, अरविंद बेडगे, कल्याणकर करपे आणि नानाराव भोसले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments