तेरणेचा छावा/धाराशिव:-
रस्ता सुरक्षा अभियान 2026 अनुषंगाने धुळे ते सोलापूर महामार्ग NH 52 वर म.पो.केंद्र धाराशिव येडशी टोल येथे म.पो.केंद्र धाराशिव आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशीव यांच्यावतीने म पो केंद्र येथील सर्व अंमलदार,येडशी टोलनाका स्टाफ,तसेच रोड वरील वाहन चालक यांची रोटरी नेत्र रुग्णालय धाराशिव यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर चे आयोजन रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी करण्यात आले.
यावेळी शिबिरा दरम्यान ज्या चालकास चष्मा निष्पन्न झाला आहे.अशा चालकास त्या त्या नंबर प्रमाणे मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. सदर नेत्र तपासणी शिबीर करिता म.पो.केंद्र धारशीव चे सपोनि/निशिकांत शिंदे पोउपनि / नारायण डप्पडवाड तसेच उप प्रादेशिक कार्यालय धाराशिव चे मोटार वाहन निरीक्षक सुशांत धुमाळे,सहाय्य्क मोटार वाहन निरीक्षक सिद्धेश्वर मस्के कार्यालय अधीक्षक नरशीन्ह कुलकर्णी तसेच रोटरी नेत्र रुग्णालयचे डॉ.इसाके, व त्यांचे सहकारी असे उपस्थित होते.
या शिबिराचा जवळजवळ 100 वाहन चालकांनी लाभ घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गरजू वाहन चालकांना या शिबिराचा मोठा फायदा मिळाला आहे.
0 Comments