Subscribe Us

प्रा.तुषार वाघमारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कळंब तालुकाध्यक्षपदी निवड


तेरणेचा छावा/धाराशिव:- 
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)  कळंब तालुकाध्यक्षपदी प्रा.तुषार बिभीषण वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षासाठी त्यांनी आजवर दिलेल्या सक्रिय योगदानाची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी दिली आहे. 
पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे यासाठी प्रा.वाघमारे निष्ठेने आणि उत्साहाने कार्य करतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाचे ध्येय-धोरणे आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार अधिक व्यापक प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल प्रा.तुषार वाघमारे  यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ  प्रा.श्रीधर भवर, नूतन जिल्हा सचिव  आत्माराम बिक्कड,भूम तालुकाध्यक्ष महेश चव्हाण,भीमा हागारे, चेतन वाघमारे यांची उपस्थिती होती.
    या निवडीबद्दल मित्रपरिवार कार्यकर्त्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments