तेरणेचा छावा/धाराशिव: - दहिफळ येथील सर्व दारु, मद्यविक्री दुकाने बंद करावी. गावातील अवैध दारू विक्री, सेवन आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्राम रक्षक दलाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या रणरागिणी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी प्रचंड गर्जना करीत दारूबंदी झालीच पाहिजे अशी आक्रमक मागणी जिल्हाधिकाऱ्यासह पोलिस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाने ही महिलांनी दारूबंदी केलेल्या मागणीला आमचा पाठिंबा असून गुरुवार ( दि.1 जानेवारी 2026) रोजी महिला ग्रामसभेचे आयोजन केलेले असून या ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण निवेदन मंगळवार दि.३० डिसेंबर रोजी देण्यात आले.
यावेळी सरपंच चरणेश्वर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सुदर्शन मडके, उपसरपंच अभिनंदन मते, ग्रामपंचायत सदस्य पुनम गोरे, समाधान मते यांची उपस्थिती होती.
0 Comments