जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आणि संजय निंबाळकर यांचा राजीनामा!
तेरणेचा छावा/धाराशिव :-
धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या पाठोपाठ संजय निंबाळकर यांनी देखील पक्षाच्या सक्रिय व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
दोघांनीही आपले राजीनामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे यांच्या नावावर लिहिले आहेत. या दोन्ही राजीनामा पत्रांमध्ये त्यांनी पक्षासाठी अनेक वर्षे निष्ठेने काम केल्याचे नमूद केले असून, काही अडचणींमुळे पुढे पक्षाचे काम यापुढे करणे शक्य नसल्यानेच राजीनामा सादर केल्याचे स्पष्ट केले आहे.
मंगळवार ( दि. ४ नोव्हेंबर) रोजी हे दोन्ही नेते बारामती येथे पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी त्यांनी आपले राजीनामे सादर केले.
नगरपालिका,नगरपरिषद जिल्हा परिषद निवडणूक साठी पक्षाचे काहीही धोरण नसल्याच्या कारणावरून व कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसल्यामुळे राजीनामा दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
. धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) आधीपासूनच कार्यकर्ते कमी व राष्ट्रीय,राज्यस्तरीय नेते, पाहुणे मंडळीचा, लाभार्थ्यांचा जास्त भरणा आंदोलना करण्यासाठी मात्र ग्रामीण भागाचे कार्यकर्ते व नेतेच असायचे, पडक्या वाड्याची पाटीलकी सांभाळायचे काम दुधगावकरकराकडे होते. वरिष्ठ नेते मंडळी फक्त त्यांच्या निवडणुकांसाठीच स्थानिक कार्यकर्त्याचा उपयोग करून घेतात व नंतर स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या की त्यांना ते वाऱ्यावर सोडतात अशा भावना तयार झाल्याने अशा परिस्थितीत जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.दरम्यान आता त्यांच्या पदाचे राजीनामे मंजूर होणार का? पडक्या वाड्याची पाटील की कोणाच्या गळ्यात माळ पडणार हे थोड्याच दिवसात समजणार आहे.
0 Comments