धाराशिव शहरातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमाणिक काम करणारे नामदेव वाघमारे यांची मंगळवार दि.४ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी धाराशिव शहर प्रभारी अध्यक्षपदी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अँड.मा.प्रणित डिकले तसेच जिल्हा महासचिव मा.धनंजय सोनटक्के यांच्या सहीने निवड करण्यात आली.
नामदेव वाघमारे हे वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय क्रियाशील एक निष्ठेने काम करणारे अशी त्यांची ओळख आहे तसेच सामाजिक कार्यामध्ये तन-मन-धनाने योगदान देणारे प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर घेऊन गरजू रक्तदात्यांना रक्त उपलब्ध करून देणारे, गुणवंतांचा सत्कार करणे, वीर महाले चौघात मोफत वाचनालय, महापुरुषाच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवणे, शहरातील महापुरुषांच्या चौकाची साफसफाई करून लोक सहभागातून दोन वर्षापासून पुष्पहार घालत आहेत तसेच सर्व जाती-धर्मातील लोकांच्या संपर्क मध्ये राहून आपुलकीने राहणारे व्यक्तिमत्व आहे त्यांचे हे सर्व काम पाहून पक्षाने त्यांना ही जबाबदारी दिली आहे. या निवडीबद्दल धाराशिव शहरवासीयातून समाधान व्यक्त करत अभिनंदन होत आहे.
0 Comments