Subscribe Us

निमजाई न्युएरा प्रा. लि. धाराशिवचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ १६ ऑक्टोबरला


तेरणेचा छावा/धाराशिव:- श्री आई तुळजाभवानी, श्री निमजाई देवी व श्री भगवंत यांच्या कृपेने निमजाई न्युएरा प्रा. लि., धाराशिव या कारखान्याचा सन २०२५-२०२६ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता शुभमुहूर्तावर पार पडणार आहे.
   या प्रसंगी समारंभाचे अग्निप्रदिपन ह. भ. प. विवेकानंद भाऊसाहेब बोधले महाराज(धामनगाव) यांच्या हस्ते होणार असून, हा कार्यक्रम वैराग-सारोळा रोड, हत्तीज, ता. बार्शी, जि. सोलापूर होत आहे.
कारखान्याचे संचालक श्री. चित्रसेन शुरसेन राजेनिंबाळकर, श्री. मकरंद शुरसेन राजेनिंबाळकर, श्री. ऋषिकेश शुरसेन राजेनिंबाळकर व श्री. मणजीत सयाजीराव देशमुख यांनी समाजातील सर्व मान्यवर, शेतकरी बांधव व हितचिंतकांना या मंगल प्रसंगी उपस्थित राहून आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments