Subscribe Us

बुधवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसी बैठक.




धाराशिव/तेरणेचा छावा:- पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह,नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे आयोजित केली आहे.या बैठकीत १ मे २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालनास मान्यता देणे,जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण,अनुसूचित जाती उपयोजना,आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासीसाठी उपयोजना) सन २०२५-२६ चा माहे सप्टेंबर २०२५ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येईल.तसेच पालकमंत्री श्री. सरनाईक यांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येईल असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. 
   त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या 2024 -25 वर्षाच्या निधीची स्थगिती ही यावेळी उठणार का याकडेही सर्व जिल्हा वाशियांचे लक्ष लागले आहे.
              

Post a Comment

0 Comments