Subscribe Us

प्रा. सोमनाथ लांडगे यांचा अहिल्या सखी मंचच्या वतीने सत्कार


तेरणेचा छावा/धाराशिव:-
 येथील शैक्षणिक व सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले श्री साई श्रध्दा एज्युकेशन, नीट ऑनलाईन टेस्ट सीरिजचे संचालक तसेच बील गेट्स जुनिअर काॅलेजचे प्राचार्य तथा अहिल्या सखी मंचचे मार्गदर्शक प्रा. सोमनाथ लांडगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 'राज्यस्तरीय कार्य गौरव' पुरस्कार अमरावती येथील अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने  दि. 11 जून 2025 रोजी अमरावती येथे समारंभ पुर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
तसेच अहिल्यानगर येथील जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय आदर्श कृतिशील शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे अहिल्या सखी मंचच्या वतीने काल सायंकाळी साडे-पाच वाजता प्रा. सोमनाथ लांडगे सरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन त्यांच्या श्री साई श्रद्धा एज्युकेशन कार्यालयात आयोजित करण्यात आलेले होते. यावेळेस प्रा. सोमनाथ लांडगे यांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. शैलजा पैकेकर यांनी लांडगे सर आपल्या नीट ऑनलाईन टेस्ट सिरीज च्या माध्यमातून अनेक गोरगरीब व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देत आहेत. त्याचबरोबर गोरगरीब विद्यार्थ्यांना अर्थिक मदत करत आहेत. ही आपल्यासाठी आनंदाची व प्रेरणादायक गोष्ट असल्याचे सांगून आम्ही अहिल्या सखी मंच म्हणून आपल्या सोबत असल्याचे सांगीतले. आम्ही महिला अहिल्या सखी मंच म्हणून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणार आहोत आम्हालाही साथ द्या, असे प्रतिपादन केले. प्रा. सोमनाथ लांडगे यांनी आपला महिला भगिनींनी केलेला सन्मान सदैव प्रेरणादायक राहील व पुढे कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल असे सांगून अहिल्या सखी मंचच्या कार्याला अशीच गती मिळत राहो अशी भावना व्यक्त करून अभार मानले. यावेळी सौ. प्रमिला बावकर, प्राचार्य रेखा जेवळीकर, अॅड. जयश्री तेरकर, अर्चना मैंदाड व उषाताई लांडगे उपस्थितीत होते

Post a Comment

0 Comments