तेरणेचा छावा/धाराशिव:-
दहिफळ येथील युवा शेतकरी बालाजी भातलवंडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेड मधून शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री सहा बोकड चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, गावाला खेटूनच भातलवंडे वस्ती येथे बालाजी भातलवंडे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय गेली 5 वर्षापासून असून त्यांनी 1 शेळी पासून आपल्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे, शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी हा पर्याय व्यवसाय चालू केलेला होता. त्यांच्याकडे एकूण लहान मोठी मिळून 24 बकऱ्या होत्या त्यातील विक्रीला आलेले 6 बोकड प्रत्येकी अंदाजे वजन 15-16 किलोचे असल्याचे सांगण्यात सांगण्यात येत आहे. आता कुठे व्यवसायात जम बसत असतानाच अचानक मोठा फटका बसल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
करीला बकऱ्याला मोठी मागणी असल्यामुळे बाजारात नेण्याच्या तयारीत असतानाच अचानक चोरी झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
नेहमीप्रमाणे बालाजी भातलवंडे शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी रात्री 10:30 वाजता बकऱ्याला चारा पाणी करून घराकडे आले असता चोरट्यांनी डाव साधत 6 बोकडावर डल्ला मारत चोरून नेले. अशाप्रकारे गावालगतच असलेल्या युवा होतकरू शेतकऱ्याच्या शेळीपालनावर चोरट्यांनी डाव साधल्यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या भागात गस्त घालण्याची मागणी नागरिकांतून होत असून पोलिसांची वचक नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे.
0 Comments