Subscribe Us

परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा कॉल,वर्षापासूनचा ग्रामस्थांचा प्रॉब्लेम सॉल.



धाराशिव/ तेरणेचा छावा:-
      1 कॉल प्रॉब्लेम सॉल, हा डायलॉग आपण पिक्चर मध्ये पाहिला आहे परंतु याचा प्रत्यय दहिफळ ता.कळंब येथील ग्रामस्थांना गुरुवार (दि.1मे ) रोजी आला आहे. 
     दहिफळ येथील ग्रामस्थ गेल्या 2 वर्षापासून कळंब बोरवली या नवीन बस सुरू होण्यासाठी  पाठपुरावा करत होते. परंतु यानात्याकारणाने त्यात यश येत नव्हते. त्यामुळे शेवटी ग्रामस्थांनी 1 मे रोजी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सकाळी 09:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांच्या कानावर ही व्यथा घातली.  पालकमंत्र्यांनी डायरेक्ट विभाग नियंत्रकांना फोन करून आत्ताच्या आत्ता तात्काळ कळंब-  बोरवली ,मोहा ,दहिफळ,येरमाळा  पुणे मार्गे गाडी सुरू करून आलेल्या ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोडून  त्याचे व्हिडिओ व फोटो  पाठविण्याची आदेश दिला. त्यानंतर यंत्रणा सतर्क झाली धाराशिव वरून ग्रामस्थ गावात पोचेपर्यंत कळंब बोरवली नवी कोरी गाडी गावात दाखल झाली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला कारण गेले 2 वर्षापासून पाठपुरावा करत असतानाही यश येत नव्हते परंतु फक्त एका फोनवर गाडी चालू झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी गाडीची पूजा करून पाठपुरावा करणाऱ्या दिलीप अंगरखे, सदाशिव वाघमारे, रामेश्वर भातलवंडे, प्रल्हाद मते, सुजित भातलवंडे, यांच्या हस्ते  नारळ फोडून ड्रायव्हर ,कंडक्टर यांना फेटे,एसटी बसला पुढील बाजूस नारळाचे फाटे बांधून शुभारंभ करण्यात आला.यावेळी सरपंच चरणेश्वर पाटील ग्रामसेवक सुदर्शन मडके, सुरेश मते, पोपट पाटील,अंगद मते, भाऊ सुतार,तानाजी मते,महादेव अंगरखे,सतीश मते,बालाजी मते, समाधान मते,समाधान भातलवंडे, ज्योतीबा ढवळे, दत्तात्रय चंदनशिवे, बाराते सह ग्रामस्थांची व परिसरातील नागरिकांची यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
       त्यामुळे बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून यंत्रणा सुतासारखी सरळ केल्यामुळे ग्रामस्थांना व परिसरातील 25 ते 30 गावातील प्रवासाचा होणारा त्रास यामुळे कमी होणार  आहे. दहिफळ ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान क तीर्थक्षेत्र दर्जा असून त्यामुळे हजारो खंडोबा भाविक दर रविवारी,यात्रेला येथे येत असतात. त्यामुळे गावाकडील व परिसरातील पुणे ,मुंबई नोकरी कामानिमित्त स्थायिक झालेल्या नागरिकांसाठी ही मोठी सोय उपलब्ध झालेली आहे. ही बस कळंब खेर्डा,बोर्डा ,मोहा ,वाघोली गौर,दहिफळ ,सापनाई,येरमाळा,बार्शी,पुणे मार्गे बोरिवली जाईल
    त्यामुळे ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments