Subscribe Us

व्यसनमुक्त भारत – सशक्त भारत’ या संकल्पना राबवत येडाई व्यसनमुक्ती केंद्रात यशस्वी व्यसनमुक्त कार्यशाळा संपन्न; ‘


तेरणेचा छावा/येरमाळा:  – समाजात व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करून आरोग्यपूर्ण आणि सशक्त भारत घडवण्याच्या दृष्टीने येडाई व्यसनमुक्ती केंद्रात एक प्रेरणादायी व्यसनमुक्त कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
     या कार्यशाळेचे उद्घाटन यश मेडिकल फाउंडेशनच्या डायरेक्टर श्रीमती सुमनताई तांबारे, येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ पल्लवी तांबारे, संचालक डॉ. संदीप तांबारे, हेड कॉन्स्टेबल एस व्ही मोठे तसेच कार्यरत सुपरवायझर प्रज्ञा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याशिवाय येरमाळा विभागातील सर्व आशा कार्यकर्त्यांनी देखील या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
    कार्यशाळेच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले. कार्यशाळेत उपस्थितांनी व्यसनमुक्ती या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
    सुमनताई तांबारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "व्यसन हा केवळ दोष नाही, तर तो एक आजार आहे. यावर उपचार शक्य आहेत, पण त्यासाठी समाजाने हातभार लावला पाहिजे." त्यांनी उपस्थित आशा वर्कर्सना उद्देशून सांगितले की, "प्रत्येक घरात पोहोचणाऱ्या आशा वर्कर्स या व्यसनमुक्त चळवळीच्या खऱ्या शिल्पकार आहेत."
     डॉ.पल्लवी तांबारे यांनी अशा कार्यशाळांच्या गरजेवर भर देत सांगितले की, "व्यसनमुक्त भारत ही केवळ घोषणा न राहता ती कृतीत उतरवण्यासाठी आपल्याला तळागाळात पोहोचावं लागेल. आशा वर्कर्स यांचं स्थान या कार्यात अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्यांचं घराघराशी सुलोख्याचं नातं आहे."
    डॉ. संदीप तांबारे यांनी व्यसनाचे वैद्यकीय दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, "व्यसन ही सवय नाही – तो एक मानसिक आणि शारीरिक आजार आहे, आणि यावर शंभर टक्के उपचार शक्य आहेत."
कार्यशाळेत सहभागी सर्व आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिकं आणि मार्गदर्शन देण्यात आले, ज्याद्वारे ते आपल्या गावात व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवू शकतील.
   कार्यशाळेच्या समारोपात उपस्थित मान्यवरांनी आणि सहभागी आशा वर्कर्सनी 'व्यसनमुक्त गाव – सशक्त समाज' घडवण्यासाठी संकल्प केला.
या उपक्रमाद्वारे एक गोष्ट अधोरेखित झाली – जर व्यसनमुक्त भारताची संकल्पना यशस्वी करायची असेल, तर समाजाच्या शेवटच्या घटकांशी जोडलेल्या आशा कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
‘व्यसनमुक्त भारत – सशक्त भारत’ या क्रांतीकडे वाटचाल सुरू झाली असून, येडाई व्यसनमुक्ती केंद्राचा हा उपक्रम त्या दिशेने एक मजबूत पाऊल ठरला आहे.
     कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प समन्वयक गणपत सिंग परदेशी, बापुराव हुलूळे,सुजित ढेकळे, प्रियंका शिंदे, नानासाहेब देशमुख, सागर शिंदे ,कविता तांबारे स्वाती भातलवंडे सुरज जाधव, युवराज पडवळ कल्पना कोठावळे यांनी अथक परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments