तेरणेचा छावा/धाराशिव :-
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. भारतीय सैन्याच्या या शूर पराक्रमाच्या सन्मानार्थ शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेतर्फे भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे. आली असून या रॅलीला प्रमुख परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांची उपस्थिती असणार असून तिरंगा रॅली सुरुवात गुरुवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 09:00 वाजता राजमाता जिजामाता चौक येथून होऊन धर्मवीर संभाजी महाराज चौक , राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत असणार आहे. तरी या तिरंगा रॅलीत सर्व देश प्रेमी नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केले आहे.
0 Comments