तेरणेचा छावा/येरमाळा:-
येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्रात स्वराज्य रक्षक,क्षात्रविर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव हुलूळे यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “संभाजी महाराजांचे विचार केवळ गौरवशाली इतिहास नाहीत, तर ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येक तरुणाने आणि व्यसनमुक्त जीवनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या व्यक्तींनी आत्मसात केला पाहिजे.”
प्रकल्प समन्वयक गणेश परदेशी यांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा परिचय उपस्थितांना करून दिला. त्यांनी सांगितले की, “संभाजी महाराज हे शौर्य, विद्वत्ता आणि नीतिमत्ता यांचे उत्तम उदाहरण होते. त्यांचं जीवन हेच व्यसनमुक्त, सशक्त आणि जबाबदार नागरिक होण्याची प्रेरणा देतं.”
कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी विचारांना उजाळा देत, उपस्थितांनी त्यांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेत व्यसनमुक्त, नीतिमूल्यप्रधान आणि देशभक्तिपूर्ण जीवन जगण्याचा ठाम संकल्प केला.
कार्यक्रमास येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे प्रियंका शिंदे,सागर शिंदे, यांनी संजय कांबळे,युवराज पडवळ, राजकुमार मुंडे,कविता तांबारे,स्वाती भातलवंडे,कल्पना कोठावळे यांच्यासह अनेक मान्यवर रुग्ण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून एकमुखाने ‘देशभक्ती, नीतिमत्ता आणि व्यसनमुक्ती’ ही मूल्यं अंगीकार करण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप “जय संभाजी, जय शिवराय” या घोषणांनी आणि राष्ट्रभक्तीच्या गजराने झाला. हा कार्यक्रम केवळ जयंतीनिमित्त सोहळा न ठरता, एक सामाजिक परिवर्तनाचा, नवचैतन्याचा आणि व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देणारा उपक्रम ठरला.
0 Comments