तेरणेचा छावा/धाराशिव: – भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या कार्यक्षमता, संघटन कौशल्य आणि दीर्घकालीन पक्षनिष्ठा लक्षात घेऊन त्यांची ही निवड केली आहे.
दत्ताभाऊ कुलकर्णी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून, त्यांनी पक्षाच्या विविध पदांवर जबाबदारी सांभाळताना नेहमीच संघटनेचा विस्तार आणि कार्यकर्त्यांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडीनंतर दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून, "पक्षाच्या धोरणांना खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जिल्ह्यातील विकासासाठी मी कटिबद्ध आहे," असे ते म्हणाले.
0 Comments