मंदिर परिसरावर २० सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची निगराणी सह 60 खाजगी सुरक्षा रक्षक तैनात... ३५० जादा एसटी बसेसची सोय... पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात...
तेरणेचा छावा/येरमाळा:-
येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा १२ ते १७ एप्रिल दरम्यान होत असुन मुख्यचुना वेचण्याचा कार्यक्रम रविवारी (दि.१३) होणार असून या कार्यक्रमासाठी दरवर्षी पंधरा लाखाच्यावर भाविक दाखल होतात. त्याअनुषंगाने भाविकांची गैरसोय होऊ नये,कायदा सुवस्था,आभादीत राखून भाविकांच्या सूरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागाने तयारी केली आहे.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन,देवस्थान ट्रस्टने तयारी केली आहे.श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला व देवीच्या पालखी सोहळ्यात चुना वेचून देवीच्या पालखीवर टाकण्याच्या कार्यक्रमासाठी राज्यभरासह बाहेर राज्यातून लाखोंच्या वर येतात.यामुळे या यात्रेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागावर ताण पडतो.
त्या अनुषंगाने सर्व प्रशासक विभागांनी जे तयारी केली असून पोलीस प्रशासनाचे सापोनि तात्या भालेराव यांनी यात्रेला उपविभागीय अधिकारी ४,सपोनी,१०,पोनि ४५,पुरुष पोलिस ३५०,महिला १५०,होमगार्ड पुरुष महिला ३००,होमगार्ड वाहतूक शाखा ४ अधिकारी ५० कर्मचारी येडेश्वरी देवीच्या पालखी मिरवणूक वेळी सुरक्षा रक्षक कडयासाठी ४० कमांडो २ आरपी प्लाटून
असा पोलिस बंदोबस्त दोन अग्निशामक बंबाची व्यवस्था केली असल्याचे सांगितले.
मंदिर ट्रस्टने शुद्ध (आर.ओ.) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून दर्शन रांगेत पाणी मिळेल अशी व्यवस्था केली आहे.मंदिर परिसर,सभामंडप या ठिकाणी ६५ तर आमराई परिसरात २० सिसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय तसेच मंदिर परिसरात पोलिसांच्या जोडीला खाजगी ६० सुरक्षा रक्षक तुकडी नेमल्याचे देवस्थान ट्रस्टचे संतोष आगलावे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतन यात्रेसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असून संपूर्ण यंत्रणा यात्रेच्या व्यवस्थापनासाठी रात्रंदिवस झटत आहे. ग्रामपंचायत कडून ३० टँकर पाणी पुरवठा करण्यासाठी तर लातूर येथील भाविक खैरमोडे यांचे १० तर बार्शी येथील माजी आमदार यांच्या वतीने २० अशा ६० टैंकर ची सोय तर दोन अग्निशामक बंबाची व्यवस्था केल्याचे सरपंच प्रिया बारकुल यांनी सांगितले.
भाविकांच्या आरोग्यसाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक तर आमराई परिसरात एक तर आरोग्य केंद्रात एक आरोग्यबूथ तर वैद्यकीय अधिकारी १९, पर्यवेक्षक १०, आरोग्य सेवक २०, सेविका १०, परिचर
१० अतिरिक्त कर्मचारी रुजू झाल्याचे डॉ. सचिन तेलप यांनी सांगितले. महावितरणकडून यात्रेसाठी परिसरातील रोहित्र, विद्युत वाहिन्या, दुरुस्तीची कामे हाती घेतली असून पर्यायी व्यवस्था येडशी येथुन उपलब्ध आहे शिवाय ग्राम पंचायत मागणी नुसार यात्रेतील व्यावसायिकांना वीज पुरवठा आदी कामे करणार आहे असे शाखा अभियंता स्नेहा कोंगलावर यांनी सांगितले.
येडेश्वरी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी परिवहन विभागाकडून यात्रा स्पेशल म्हणून धाराशिव विभागाच्या २००, तर लातूर, बीडच्या १५० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. बीड विभागाचे यात्रा शेड बिजगुनन केद्राच्या बाजूला बीड रोडवर,लातूर,सोलापूर,धाराशिव कडे जाण्यासाठी बीएसएनएल उपकेंद्रा जवळ तर बार्शी,करमाळा,परंडा आगाराच्या बसेससाठी मुंबई,पुणे,कोल्हापूर,पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी बार्शी रोडवरील महावितरण उपकेंद्राच्या शेजारी यात्रा शेडची करण्यात आली आहे. जिल्हावाहतूक नियंत्रक संतोष कोष्ठी यांनी सांगितले.
आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या कडून पालखीवर हेलीकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी..
पालखी चुन्याचा रानात दाखल होताच पालखीवर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी आ.राणाजगजिसिंह पाटील यांच्या वतीने करण्यात येणार असल्याचे माजी उपसरपंच गणेश बारकुल यांनी सांगितले.
0 Comments