Subscribe Us

भुसणी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची प्रभातफेरी द्वारे जनजागृती


तेरणेचा छावा/धाराशिव:-
मौजे भुसणी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गावस्तरीय हवामान अनुकूल सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यासाठी पाच दिवसांचे लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सलग पाच दिवस गावक-यांच्या सहभागातून विविध उपक्रमांद्वारे प्रकल्पाची ओळख व उपयुक्तता याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.त्याअंतर्गत शून्य दिवसात ग्राम कृषी विकास समितीची बैठक घेण्यात आली व त्यानंतर सायंकाळी भुसणी गावांमध्ये मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले.तसेच पहिल्या दिवशी ग्राम कृषी विकास समिती व जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक शाळेतील शिक्षक , विद्यार्थी व गावातील भजनी मंडळयांच्या सहकार्याने  प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले व गाव नकाशा तयार करण्यात आला.  यावेळी श्री असलकर महादेव उपविभागीय कृषी अधिकारी धाराशिव व श्री जोशी प्रकल्प विशेषज्ञ व श्री डी बी रितापुरे  तालुका कृषी अधिकारी उमरगा श्री ताराळकर शिवाजी मंडळ कृषी अधिकारी सास्तुर तालुका लोहारा यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच श्री ए बी पटवारी  मंडळ कृषी अधिकारी मुरूम, श्री मुळे दिपक मंडळ कृषी अधिकारी उमरगा ,तसेच श्री एस टी शिंद , श्री फडणीस साहेब, श्री पी एस भोसले , श्री ढोकळे , श्री पी के पाटील  कृषी पर्यवेक्षक , श्री आर एस पाटील कृषि सहाय्यक व श्री बी.ए.निकम ग्रामपंचायत अधिकारी व सौ. अनुराधा वाघमारे ग्राम महसूल अधिकारी व तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक, ग्राम कृषी विकास समितीचे सर्व सदस्य व स्वयंसेवक, गावातील भजनी मंडळ, शालेय विद्यार्थी,महिला बचत गट प्रतिनिधी, गावातील पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments