शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचे आवाहन
तेरणेचा छावा/धाराशिव:-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना पक्षाच्या उपनेत्या डॉ. नीलमताई गोर्हे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा गुरुवार, दि. 3 एप्रिल रोजी धाराशिव येथील पुष्पक मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोर्हे गुरुवारी धाराशिव जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत धाराशिव शहरातील पुष्पक मंगल कार्यालय येथे शिवसैनिकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात डॉ. नीलमताई गोर्हे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत.
शिवसेना प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक , महिला आघाडी, युवासेना, तसेच शिवसेनाच्या सर्व अंगीकृत संघटना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी केले आहे.
0 Comments