Subscribe Us

व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुकाध्यक्षपदी कुंदन शिंदे यांची निवड


धाराशिव/तेरणेचा छावा:- पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकमेव संघटना व्हाईस ऑफ मीडियाच्या धाराशिव तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी अभिषेक ओव्हाळ यांची निवड झाली आहे.
   धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा सरचिटणीस आकाश नरोटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य किशोर माळी, जिल्हा संघटक काकासाहेब कांबळे ,साप्ताहिक विंगचे जिल्हाअध्यक्ष पांडुरंग मते ,उपाध्यक्ष जफर शेख यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
    नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्ष अल्ताफ शेख सरचिटणीस प्रशांत सोनटक्के,सहसरचिटणीस मुस्तफा पठाण,कोषाध्यक्ष कलीम शेख,कार्यवाहक सचिन  वाघमारे,प्रसिद्धी प्रमुख राहुल कोरे,संघटक आप्पासाहेब सिरसाठे यांची निवड करण्यात आली यावेळी सदस्य: किरण कांबळे, प्रशांत मते, रोहित लष्कारे, सचिन देशमुख, प्रशांत गुंडाळे, सुमेध वाघमारे, अली शेख, रमाकांत हजगुडे उपस्थित होते.       या निवडीमुळे धाराशिव तालुक्यातील पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून हक्कांसाठी लढण्यास अधिक बळ मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments