पालकमंत्र्यांच्या हस्ते पत्रकारांचा विमा संरक्षण कार्डचे वितरण, व्हॉईस ऑफ मीडियाचा सलग तिसऱ्या वर्षी कार्यक्रम
धाराशिव/ तेरणेचा छावा:- परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर दि.१९ व २० फेब्रुवारी असे 2 दिवस येत आहेत. त्यांच्या हस्ते व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी काढण्यात येत असलेल्या संरक्षण विमा कार्डचे वितरण दि.२० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. दरम्यान मंत्री सरनाईक हे सोलापूर ते धाराशिव हा प्रवास सर्वसामान्य प्रवाशाप्रमाणे एसटी बस मधून करणार आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- दि.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सोलापूर बस आगार येथून एसटीने धाराशिवकडे प्रयाण तर सायंकाळी ६ वाजता धाराशिव येथे आगमन व मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती तसेच सायंकाळी ७ वाजता धाराशिव येथून मोटारीने कळंबकडे प्रयाण तर सायंकाळी ७.४० वाजता कळंब येथे आगमन व कळंब येथील स्वागत समारंभास उपस्थिती तर रात्री ८ वाजता कळंब येथील शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थिती. तसेच शिवसेना तालीम संघ शिवजयंती उत्सवात उपस्थिती. रात्री ८.४५ वाजता बस आगार कळंबची पाहणी करून रात्री ९ वाजता सोलापूरकडे प्रयाण व मुक्काम करतील.
२० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सोलापूर येथून तुळजापूरकडे प्रयाण ८.४५ वाजता तुळजापूर येथे आगमन. सकाळी ८.४५ ते सकाळी ९.४५ वाजता दरम्यान आई तुळजाभवानी मातेचे कुटुंबासमवेत दर्शन व महापूजा. सकाळी ९.४५ ते १० वाजता आई तुळजाभवानी मंदिरामधील गाभाऱ्यातील दगडांना तडे गेल्या संदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी व चर्चा. सकाळी १० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत श्री तुळजाभवानी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची १२४ भक्त निवासस्थान, तुळजापूर येथे पाहणी व सकाळी १०.१५ वाजता राणी लक्ष्मीबाई उद्यान सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहून सकाळी १०.३० वाजता तुळजापूर येथून शासकीय मोटारीने धाराशिवकडे प्रयाण करतील. सकाळी १०.५० वाजता धाराशिव येथे आगमन व व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी १२.१५ वाजता नळदुर्ग येथे आगमन व नळदुर्ग किल्ल्याची पाहणी.दुपारी दुपारी १ ते दुपारी २ वाजतापर्यंत उपजिल्हा रुग्णालय,नळदुर्ग लोकार्पण सोहळा व विविध रुग्णालय ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी २ वाजता नळदुर्ग येथून शासकीय वाहनाने सोलापूरकडे प्रयाण करतील.
धाराशिवच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्याकडे आल्यानंतर धाराशिव जिल्हावाशीय मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत आहेत, पालकमंत्री ही मोठा डामडौल न करता पहिल्या दौऱ्यात त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकाच्या घरी जाऊन रात्रीचे जेवण केले. तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणार असल्याचे धाराशिव जिल्हावाशीयांना 50 नवीन एसटी बस देण्याची घोषणा करून लगेच 25 बस देण्यात आल्या. पहिल्याच जिल्हा नियोजन समितीत कामाची चुणूक दाखवत तुळजापूर इथे नवीन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल ला मान्यताही दिली. त्यामुळे धाराशिवकरांची पहिल्याच दौऱ्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मने जिंकण्याची चर्चा जिल्हावाशियातून एकावयास येत आहे.
0 Comments