ढोकी येथील नोंदणी अभियानास मोठा प्रतिसाद
धाराशिव /तेरणेचा छावा:- शिवसेना पक्षाच्यावतीने बांधकाम व इतर कामगारांची नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी कामगारांना प्रमाणपत्र व त्यांच्या पाल्यांना संगणक तसेच इतर साहित्याचे वाटप जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
असंघटित व वंचित कामगारांना शिवसेनेचा मदतीचा हात एकनाथ या कार्यक्रमांतर्गत धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे धाराशिव व कळंब तालुक्यातील बांधकाम व इतर कामगारांचे मोफत नोंदणी अभियान शिवसेनाच्यावतीने राबविण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, निहाल भाई काजी, झुंबर (आबा) बोडके, आनंदराव (अण्णा) देशमुख, सतीश (पप्पू) वाकुरे, विलास रसाळ, नासिर काझी, असलम पठाण, मुजीब पठाण, अरुण डोलारे, गुणवंत पापा देशमुख, दत्ताभाऊ तिवारी, राहुल कोरे, उत्तम कीर्तने, काका वाकुरे, बाळासाहेब समुद्रे, अनिल शिंदे, अजय पाटील आदी उपस्थित होते.
बांधकाम व इतर कामगार विभागाच्या माध्यमातून बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी ३० हजार रुपये, त्याच्या पहिल्या पत्नीच्या प्रसुतीसाठी १५ हजार रुपये, सिझर (ऑपरेशन) झाल्यास २० हजार रुपये, प्रती २ अपत्यास ३० हजार रुपये, मुलाच्या विवाहासाठी ३० हजार रुपये तर मुलीच्या विवाहासाठी ५१ हजार रुपये, कामगारास अपंगत्व आल्यास
२ लाख रुपये, कामगार गंभीर आजार झाल्यास १ लाख रुपये, कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, बेघर कामगारास घरकुलासाठी २ लाख रुपये, कामगाराचा कामावर मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये, कामगाराच्या विधवा पत्नीस प्रती वर्ष २४ हजार रुपये, घर बांधणीसाठी ६ लाख रुपयांपर्यंत कर्जावरील व्याज ५ वर्षात १ लाख २० हजार रुपये महामंडळ भरते, कामगारांच्या पहिल्या २ अपत्यास १ ली ते ७ वी पर्यंत प्रती वर्ष अडीच हजार रुपये, ८ वी ते १० वी प्रती वर्ष ५ हजार रुपये, १० वीमध्ये ५० टक्के गुण घेतल्यास १० हजार रुपये, ११ वी व १२ वी प्रती वर्षी १० हजार रुपये (दोघांसाठी २० हजार रुपये), १२ वीला ५० टक्के गुण घेतल्यास १० हजार रुपये, ग्रॅज्युएशनसाठी प्रती वर्ष २० हजार रुपये (३ वर्षांसाठी ६० हजार रुपये), पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रती वर्षे २५ हजार रुपये, इंडियन शिक्षणासाठी प्रती वर्ष ६० हजार रुपये (एकूण २ लाख ४० हजार रुपये), एमबीबीएस शिक्षणासाठी प्रती वर्षे १ लाख रुपयांप्रमाणे ५ लाख रुपये आदी सुविधांचा लाभ देण्यात येतो. तसेच कामगाराह गम बूट, घमेले, फावडे, पेटी, हातमोजे व इतर अत्यावश्यक साहित्य दरवर्षी देण्यात येते. मात्र, याचा लाभ कामगारांना वेळेवर मिळत नसल्यामुळे हे अभियान राबविण्यात येऊन बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यांना साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बांधकाम कामगार व त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments