परंडा विधानसभेसाठी शिवसैनिकांची मातोश्रीकडे मागणी
धाराशिव,/तेरणेचा छावा : परंडा विधानसभा मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ राहिलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी मिळायला हवी. बंडखोराला धडा शिकवण्यासाठी रणजीत पाटील यांच्यासारखा कडवट शिवसैनिकच उमेदवार हवा अशी मागणी मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असल्याने परांड्यातील शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. याच मतदार संघातुन धनुष्य बाणावर निवडून आलेल्या उमेदवाराने गद्दारी केली आहे. त्याला धडा शिकविण्यासाठी कडवट शिवसैनिकच उमेदवार हवा. माजी आमदार तथा शिवसेना नेते दिवंगत ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकवतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासात करणारांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी रणजित पाटील हेच उमेदवार असायला हवेत अशी मागणी मातोश्रीवर जाऊन परंडा तालुक्यातील जुन्या शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी केली आहे.
रणजित पाटील यांच्या उमेदवारीला जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या नेत्यांचा विरोध असून ते अन्य पक्षातील उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे. त्यासाठी वाशी येथील पूर्वी काँग्रेस पक्षात मुख्य पदाधिकारी राहिलेल्या नेत्यासोबत अर्थपूर्ण बोलणी झाल्याचीही चर्चा सुरू आहे. रणजित पाटील यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांनी अद्याप मतोश्रीकडे मागणी न केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या संतप्त भावना असल्याचे एका प्रमुख पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. मतदार संघ राहिलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी मिळायला हवी. बंडखोराला धडा शिकवण्यासाठी रणजीत पाटील यांच्यासारखा कडवट शिवसैनिकच उमेदवार हवा अशी मागणी मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असल्याने परांड्यातील शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. याच मतदार संघातुन धनुष्य बाणावर निवडून आलेल्या उमेदवाराने गद्दारी केली आहे. त्याला धडा शिकविण्यासाठी कडवट शिवसैनिकच उमेदवार हवा. माजी आमदार तथा शिवसेना नेते दिवंगत ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकवतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासात करणारांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी रणजित पाटील हेच उमेदवार असायला हवेत अशी मागणी मातोश्रीवर जाऊन परंडा तालुक्यातील जुन्या शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी केली आहे.
रणजित पाटील यांच्या उमेदवारीला जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या नेत्यांचा विरोध असून ते अन्य पक्षातील उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे. त्यासाठी वाशी येथील पूर्वी काँग्रेस पक्षात मुख्य पदाधिकारी राहिलेल्या नेत्यासोबत अर्थपूर्ण बोलणी झाल्याचीही चर्चा सुरू आहे. रणजित पाटील यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांनी अद्याप मतोश्रीकडे मागणी न केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या संतप्त भावना असल्याचे एका प्रमुख पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
0 Comments