Subscribe Us

नामदेव वाघमारे यांना शिवरक्षक जिवाजी महाले नाभिकरत्न पुरस्काराने सन्मानित.


धाराशिव )तेरणेचा छावा:-
 अखिल भारतीय जिवा या संघटनेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव जिल्हा अखिल भारतीय जीवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे यांना  संघटनेमधील काम तसेच सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गोविंद पिंपळगावकर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा.राजकुमार गाजरे यांच्या हस्ते २७ मे रोजी धुळे येथे शिवरक्षक जिवाजी महाले नाभिकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . 
नामदेव वाघमारे गेल्या दहा वर्षापासून धाराशिव शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती समारंभ कार्यक्रम  प्रबोधनात्मक कार्यक्रम, व्याख्याने,,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर आठवड्यातून एकदा सर्व चौकातील महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करत पुष्पहार अर्पण करत आहेत. तसेच सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणारे उमदे कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 
   यावेळी  संघटनेचे  सन्माननीय कर्मचारी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण कोंडावार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले,महाराष्ट्र प्रदेश सचिव साहेबराव शेळके,महाराष्ट्र प्रवक्ते सुरेश बोर्डे,महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मीनाक्षीताई भदाणे,युवक प्रदेशाध्यक्ष देविदास भाऊ फुलपगारे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते 
   नामदेव वाघमारे यांना शिवरक्षक जिवाजी महाले नाभिकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रपरिवार व सर्व समाज बांधवाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments