Subscribe Us

हर्षद तोडकरी या विद्यार्थ्याने कोणताही क्लास न लावता मिळविले 100℅ गुण.


 धाराशिव/तेरणेचा छावा;- .
 धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे शिक्षण घेत हर्षद संतोष तोडकरी या विद्यार्थ्याने  दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळविले आहेत
   एकदम  परिस्थिती हालाकीच्या असताना   छोटेसे किराणा दुकानातच वडिलांना मदत करत करत शिक्षण घेत कोणताही क्लास किंवा टीव्हीशन नसताना, गरिबीवर मात करून हर्षद ने 100% गुण मिळवले आहेत.  विशेष म्हणजे मराठी ,,गणित व संस्कृत या विषयात 100℅ गुण मिळाल्याने विशेष कौतुक होत आहे. 
       हर्षदच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन ,कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला.यावेळी  शिवकुमार अवधुत, तेरणेचा छावाचे संपादक पांडुरंग मते, अनिल उंबरे, व विशाल अवधुत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments