Subscribe Us

मलकापूर- सापनाई- दहिफळ- मोहा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू! चौकशी करण्याची मागणी

धाराशिव /तेरणेचा छावा:-
       राष्ट्रीय महामार्ग ते सापनाई, दहिफळ, मोहा, रस्त्याचे अर्धवट व खोदकाम अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे न करता कमी करुन त्यावर अनेक महिन्यापासून खडी हथरान ठेवल्यामुळे अपघात होत असल्यामुळे संबंधीत काम पाहणाऱ्या यंत्रणेवर व ठेकेदारावर अपघाताचे गुन्हे दाखल करुन सदर कामाचे वरिष्ठ स्तारावरुन चौकशी कमेटी नियुक्त करुन चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते छबुराव बाराते यांनी कार्यकारी अभियंता रस्ते विकास सोसायटी धाराशिव यांच्याकडे केली निवेदनाद्वारे केली आहे.
    याविषयी सविस्तर माहिती अशी की सदरचे काम हे कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था धाराशिव या योजने मार्फत करण्यात येत आहे.
      सदर काम हे कामाच्या अंदाजपत्रकामाप्रमाणे रस्ता न खोदकाम करता थोडेफार खोदकाम सदर कार्यालयाचे काम पाहणारे सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता व संबंधीत काम करणारे ठेकेदार यांच्या संगनमताने निकृष्ठ व बोगस काम चालु आहे.
   हे बोगस व निकृष्ठ काम करुन लाखो रुपयाचा गैरव्यवहार करण्याचा त्याचा पूर्वगृहदोषीत कट दिसुन येत आहे. त्यामुळे सदर प्रकरणांची तात्काळ चोकशी करण्यात यावी.
      सदर रस्त्याचे काम अनेक महिन्यापासुन काम करणाऱ्या ठेकेदारांनी व सदर काम पाहणाऱ्या यंत्रणेने जाणीवपूर्वक नागरीकांना त्रास देण्याच्या उध्देशाने प्रेरीत होवून रस्त्यावर टाकून सापनाई गावात येणारी बस ही बंद केलेली आहे. त्यामुळे मोटार सायकल व फोर व्हिलरचे अपघात होत आहे.
     सदर अपघातात अनेक नागरीक जखमी झालेले आहेत. तसेच भविष्यात एकादया नागरीकाचा रस्त्यावरील खडीवर पडुन मृत्यु झाल्यास सदर मृत्यूस कारणेभूत ठरणाऱ्या ठेकेदारावर व सदर रस्त्याचे काम पाहणाऱ्या सहाय्यक अभियंतेवर तसेच कार्यकारी अभियंतेवर अपघाताचे व भविष्यात सदर कामावर खडी हावरुन काम बंद ठेवणाऱ्यावर अपघाताचे व नागरीकांच्या मृत्यु कारणीभूत ठरणाऱ्यावर खुनाचे गुन्हे दाखल करुन सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर तात्काळ निलंबनाची कार्यावाही करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनाच्या प्रती १) मा. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय, कळंच.
२) मा. कार्यकारी अभियंता (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,) धाराशिव.
३) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धाराशिव.
४) मा. जिल्हाधिकारी साहेब, कार्यालय, धाराशिव.
५) मा. आयुक्त साहेब (महसुल) आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर.
६) मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई.
७) मा. विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई. यांना देण्यात आलेले आहेत.
    काम चालू झाल्यानंतर दहिफळ ग्रामपंचायत कार्यालयाने ही निकृष्ट काम होत असल्याच्या तक्रारी कार्यालयाकडे देण्यात आल्या होत्या तरीही कामात सुधारणा न होता काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने परिसरातील नागरिक मात्र रोडच्या या निकृष्ट कामामुळे पुरते हैराण झालेले आहेत. त्यामुळे सदरचे काम हे  अंदाजपत्रकानुसार करून घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री ग्रामसडक जिल्हा कार्यालयाच कार्यालयाची असतानाही  नेमकं पाणी कुठे मुरतंय असा सवाल परिसरातील नागरिकांतून एकावयात येत आहे.

Post a Comment

0 Comments