Subscribe Us

ताई की दादा कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला!


धाराशिव /तेरणेचा छावा:- धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नसल्याने ताई की दादा फायनल होणार याची कार्यकर्त्यातून व जनतेतून जोरदार चर्चा सुरू आहे. 
    उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे माजी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नाव मागेच निश्चित झाले आहे. परंतु महायुतीच्या उमेदवाराचे नावाची अद्याप पर्यंत घोषणा करण्यात आलेली नाही. महायुतीतील कोणत्या घटक पक्षांना ही जागा मिळणार याचीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही परंतु अधिकृत सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रथम सुरेश दाजी बिराजदार नंतर आमदार विक्रम काळे यांच्या नावाची चर्चा होती परंतु गेल्या दोन दिवसापासून जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांना तिकीट फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत यांचेही तिकीट फायनल असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे नेमकं कोणत्या पक्षाला जागा सुटते आणि कोणाला उमेदवारी मिळते याविषयी मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे, तसेच वंचित बहुजन आघाडी ,ओबीसी जनमोर्चा ,अपक्ष यांच्याकडूनही उमेदवारांच्या नावाचनावाची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे महायुती, वंचित बहुजन आघाडी, ओबीसी जन मोर्चा ,अपक्ष यांच्याकडून चर्चेतील  नावातील उमेदवार फायनल  होतात की अनपेक्षित लॉटरी लागते हे लवकरच समजणार आहे.
   एवढं मात्र खरं की महायुतीकडून ताई फायनल होतात का दादा याची उत्सुकता मात्र कार्यकर्त्यांना कायम लागलेली आहे!

Post a Comment

0 Comments