Subscribe Us

संतोष आगलावे यांचा जनहित पतसंस्थेत सत्कार


येरमाळा / तेरणेचा छावा:-
 जनहित पतसंस्थेच्या कार्यालयात येडश्वरी कोंचीग क्लासेसचे संचालक  संतोष आगलावे सर यांचा सत्कार बुधवार (दि.1 मार्च) रोजी करण्यात आला .
येडेश्वरी कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून येरमाळा गावातील इ.8 वी च्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या  NMMS परिक्षा  आणि राज्य सरकारच्या सारथी स्कॉलरशिप च्या माध्यमातून १०९२००० / - एवढी स्कॉलरशीप मिळवून दिल्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना भावी शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे .त्याच बरोबर आर्थिक आधार मिळाल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये उत्साह वाढून शैक्षणिक वातावरण उत्साही झाले आहे .
क्लासेस च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे अद्यावत ज्ञान / मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम अविरत चालू आहे .त्यामुळे क्लासेसचे संचालक संतोष आगलावे यांचा सत्कार जनहित पतसंस्थेत करण्यात आला यावेळी जनहित पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा.संतोष तौर ,वल्लभ माशाळकर,शिवप्रसाद घेवारे , समाधान भगत, पवन ओव्हाळ , अभिजित पाटील ,अभिजीत कुलकर्णी सह सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments