धाराशिव/ तेरणेचा छावा:-जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील उस्मानाबाद येथील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमच्या मैदानावर जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन दि.२४-२६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी क्रीडा स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील खोताचीवाडी जिल्हा परिषदेच्या सहशिक्षिका मनिषा क्षीरसागर-खडके यांना १ कांस्य तर ४ सांघिक चषके पटकावीत त्या या विजयाच्या मानकरी ठरल्या आहेत.
यावेळी सांघिक खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, क्रिकेट बॅडमिंटन, रिंग टेनिस, रस्सीखेच, रिले तर वैयक्तिक १००, २०० व ४०० मीटर धावणे, गोळा फेक, थाळीफेक, एकेरी बॅडमिंटन, दुहेरी बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, लांब उडी व टेबल टेनिस आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यापैकी मनीषा क्षीरसागर -खडके यांनी मिळवलेले सुवर्णपदक, कास्यपदक व सांघिक चषकाचे वितरण अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सुर्यकांत भुजबळ, (पंचायत) श्याम गोडभरले व तुळजापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
वैयक्तिक स्पर्धा -१०० मीटर रनिंग स्पर्धा - सुवर्णपदक, २०० मीटर रनिंग स्पर्धा- सुवर्णपदक, ४०० मीटर रनिंग स्पर्धा- सुवर्णपदक,
बॅडमिंटन दुहेरी स्पर्धा -सुवर्णपदक, बॅडमिंटन एकेरी स्पर्धा - कांस्यपदक
सांघिक स्पर्धा रिले १०० × ४ सांघिक स्पर्धेत - प्रथम क्रमांकाचे चषक, ४०० × ४ सांघिक स्पर्धेत - द्वितीय क्रमांकाचे चषक, रिंग टेनिस सांघिक स्पर्धेत - प्रथम क्रमांकाचे चषक खो - खो सांघिक स्पर्धेत - तृतीय क्रमांकाचे चषक स्पर्धेमध्ये यश मिळविल्याबद्दल तुळजापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, गट शिक्षणाधिकारी मेहरून्नीसा इनामदार, कार्यालयीन विस्ताराधिकारी डॉ.वाय.के. चव्हाण, मंगरूळ बीटचे विस्ताराधिकारी मल्हारी माने, अर्जुन जाधव, तुळजापूर ग्रामीण बीटच्या विस्ताराधिकारी दैवशाला शिंदे, अणदूर बीटचे विस्ताराधिकारी माळी, तीर्थ केंद्राचे केंद्र प्रमुख तानाजी महाजन, अपसिंगा केंद्राचे केंद्र प्रमुख ऋषिकांत भोसले, काक्रंबा केंद्राचे केंद्र प्रमुख सतीश हुंडेकरी, क्रीडा मार्गदर्शक अण्णा दळवी, रामकृष्ण खडके, कांता राऊत-गोळ, खोताचीवाडीचे सरपंच मोहिनीताई क्षीरसागर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग पवार, शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके आदींनी क्षीरसागर-खडके यांचे अभिनंदन केले.
0 Comments