Subscribe Us

भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट-६, तेरणा नगर, ढोकी कारखान्याचा चौथा बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न.

तेरणेचा छावा/तेरणा नगर, ढोकी : महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. श्री. तानाजीराव सावंत यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट-६, तेरणा नगर, ढोकी कारखान्याचा सन २०२६-२७ चा चौथा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजता उत्साहात पार पडला.
भैरवनाथ शुगर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन मा. श्री. अनिलदादा सावंत यांच्या शुभहस्ते हा अग्नि प्रदीपन समारंभ संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन विक्रम उर्फ केशव सावंत, भैरवनाथ शुगर वर्क्स लि. आळेगाव युनिटचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत, वाकळ गावचे सरपंच ऋतुराज मामा सावंत, भैरवनाथ ग्रुपचे संचालक वाडेकर, जिल्हा परिषद सदस्य अजित लाकाळ, ॲड. अजित खोत, शिराढोण गावचे नितीन आबा पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ढोकी शाखेचे व्यवस्थापक श्री. फुले यांच्यासह कारखान्यातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
या प्रसंगी चेअरमन अनिलदादा सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहन केले. शेतकरी आणि कारखाना यांच्यातील परस्पर सहकार्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौथ्या बॉयलर अग्नि प्रदीपनामुळे कारखान्याच्या २०२६-२७ गाळप हंगामाला उत्साहात सुरुवात झाली असून, परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments