Subscribe Us

जागृत प्रवासी संघटना,जनहित प्रवासी संघटना यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर कळंब पंढरपूर बस गाडी सुरू


तेरणेचा छावा/दहिफळ:-
दहिफळ व परिसरातील प्रवासी सेवेसाठी सदैव तत्पर असलेली  जागृत प्रवासी संघटना व जनहित प्रवासी संघटना यांच्या पाठपुराव्याला  यश आले असून शनिवार (दि.10 ऑक्टोबर) रोजी कळंब पंढरपूर ही बस दहिफळ येथे आल्यानंतर प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी बसचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
   यावेळी कळंब आगारप्रमुख घोलप, टी.आय.जाधव,टी.एम. धावारे,चालक वाहक यांचा यावेळी फेटा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जागृत प्रवासी संघटनेचे दिलीप अंगरखे, रामेश्वर भातलवंडे,सुरेश मते, तानाजी मते,वसंत भातलवंडे सुजित भातलवंडे,समाधान मते वसंत धोंगडे,गंगाधर ढवळे, बापू मते खंडू कुठे कांता दादा गोरे बाबासाहेब भातलवंडे,वसंत किलचे, बालाजी भातलवंडे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर बसच्या स्वागताला उपस्थिती होती. ही बस सेवा परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव विभाग नियंत्रक पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून तगादा लावल्यामुळे या नवीन बसची सुरुवात झाली आहे. यामुळे जागृत प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक,धाराशिव उपविभागीय नियंत्रक पाटील,कळंब बसस्थानकाचे नियंत्रक घोलप यांचे अभिनंदन केले आहे.   
  ही बस कळंब वरून सकाळी 08:00 ते 08:30 च्या दरम्यान सुटणार असून दहिफळ येथे 09:30 च्या दरम्यान येईल   पंढरपूर येथे 12:00 वाजता पोहोचेल.नंतर दुपारी 02:00 वाजता पंढरपूर वरून निघून  05:00 वाजता दहिफळ येथे येईल.अशाप्रकारे सध्या तरी अशा प्रकारचे वेळापत्रक ठेवण्यात आले आहे.
   जागृत प्रवासी संघटना व जनहित प्रवासी संघटना यांच्या पाठपुराव्यामुळेच कळंब बोरवली, वाशी- लातूर, याआधी या गाड्या सुरू झालेल्या आहेत तर दहिफळ मार्गावरील इतर गाड्यांच्या वेळापत्रकाकडे यांचे बारकाईने लक्ष असते गाडी वेळेवर नाही आली अथवा गाडी आली नाही तर  तात्काळ फोन लावून संबंधितांना याची माहिती देण्याचं काम करण्यात येते. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते.
   कळंब पंढरपूर ही नवीन बस गाडी चालू झाल्यामुळे पंढरपूरला दर्शनाला जाण्यासाठी वारकरी व परिसरातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे  परिसरातील नागरिकांतून जागृत प्रवासी संघटना व जनहित प्रवासी संघटनेचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments