Subscribe Us

कळंब येथे तब्बल ५९ लाखांचा अवैध गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य साठा जप्त!”


तेरणेचा छावा/धाराशिव:-
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परी. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कळंब पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली.
    दि. २४/०६/२०२६ रोजी या मोहिमेदरम्यान परी. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत डीकसव (ता. कळंब) येथील प्रभाकर भैरुबा चौधरी यांच्या घरातील एका खोलीवर छापा टाकला. सदर ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्यास अपायकारक ठरणारा गुटखा तसेच विविध तंबाखूजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला.
   याबाबत घरमालक प्रभाकर चौधरी यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सदर खोली मागील एक महिन्यापासून गणेश भिकाजी घेवारे (रा. डीकसव, ता. कळंब) यांना भाडेतत्त्वावर दिल्याचे सांगितले. पुढील चौकशीत जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित साठा हा गणेश घेवारे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
सदर छाप्यात दोन पंचांसमक्ष खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:

            छाप्यामध्ये सम्राट पान साला 3240 पुडे, गोवा 1000गुटखा 9040 पुडे, तारा सुगंधित पान मसाला 1248, signature pan masala 458 पुडे,  action7 scented tobacco817 पुडे, k.R. 1000गुटखा 518 पुडे, रत्नछाप NO300SCENTED TOBACCO224 पुडे, माणिकचंद पान मसाला 778पुडे, शिमला गुटखा 600 पुडे, LCC1000ZAFRANI ZARDA 748 पुडे, MC scented tobacco 900 पुडे, AB scented tobacco250 पुडे,अलीबाबा पान मसाला 225 पुडे, TTS scented tobacco1035 पुडे,UNLABELED scented tobacco 665 पुडे,  VT scented tobacco 50 पुडे, जायका १००० गुटखा60 पुडे, SOCIETY PAN MASALA50 पुडे, RKWORLD scented tobacco  40 पुडे,  ORIGINAL300 scented tobacco 26 पुडे विविध कंपन्यांचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण ₹५९,२३,१२८/- (अक्षरी रुपये एकोणसाठ लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावीस मात्र) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल पोलीस ठाणे कळंब येथे जमा करण्यात आला असून, अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये पुढील कायदेशीर कारवाईसाठी मा. अन्न व औषध प्रशासन, धाराशिव यांच्याकडे आवश्यक अहवाल सादर करण्यात आला आहे.
                          कारवाईत सहभागी पथक
परी. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या यशस्वी कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण सोमवंशी, श्री. सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रामचंद्र बहुरे, श्री. सिराज पठाण तसेच RCP, QRT पथकातील अधिकारी-कर्मचारी आणि कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी मोलाची भूमिका बजावली.

Post a Comment

0 Comments