तेरणेचा छावा/धाराशिव:-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रविवार दि. 28 जून रोजी धाराशिव येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकत्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवशीय दौऱ्याचे आयोजन केलेले असून हा दौरा पक्ष फुटीर खासदारांच्या मतदारसंघात आयोजित केलेला असून 26 जून रोजी यवतमाळ पासून चालू झालेला हा दौरा 28 जून रोजी धाराशिव येथे दुपारी 03:30 वाजता सिद्धाई मंगल कार्यालय येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धाराशिव जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख शंकर तात्या बोरकर यांनी केले आहे.
0 Comments