Subscribe Us

सामाजिक कार्यकर्ते सुंदर लोमटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश.


तेरणेचा छावा/कळंब : सामाजिक कार्यकर्ते सुंदरबापू लोमटे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
       पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    सद्ध्याचे स्थिर सरकारच महाराष्ट्रातील अस्थिर राजकिय परस्थितीला जबाबदार असुन, राज्याची संपन्न राजकिय परंपरा परत स्थापित करण्याची क्षमता केवळ शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारात आहे. राज्याच्या हितासाठी आज त्यांच्याच पक्षाला बळ देणे गरजेचे असल्याचे मत यावेळी लोमटे यांनी व्यक्त केले.
सुंदर बापू लोमटे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांचा तालुक्यात जनसंपर्क मोठा असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार आहे. आगामी काळात पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून विकासकामांना गती देण्यासाठी ते सक्रियपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष डॅा.प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मा. रोहितदादा पवार यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
    यावेळी जेष्ठ नेते जीवनराव गोरे, तालुकाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे, बालाजी अल्टे, रमेश देशमुख, माणिकराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments