Subscribe Us

युवा सैनिकांचं खा.संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन


तेरणेचा छावा/धाराशिव : युवासेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी भारतीय युवकांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. युवकांना “मंद” म्हणणे हे संपूर्ण युवा वर्गाचा अपमान असून, अशा वक्तव्यांविरोधात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाही मार्गाने बुधवार दिनांक 20 मार्च मे रोजी धाराशिव सोलापूर मार्गावर एमएससीबी ऑफिस जवळ आंदोलन करत संताप करत निषेध व्यक्त केला.
     यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील युवकांचा स्वाभिमान दुखावणारी वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत. युवकांच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठी युवासेना नेहमीच ठामपणे उभी राहील, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात युवासेना लोकसभा संपर्क प्रमुख किरण गायकवाड, युवासेना धाराशिव-कळंब विधानसभा संपर्क प्रमुख अभिराम पाटील, युवासेना तुळजापूर विधानसभा संपर्क प्रमुख गणेश रोजकरी, युवासेना उमरगा विधानसभा संपर्क प्रमुख शरद पवार, धाराशिव युवासेना जिल्हा प्रमुख गणेश जगताप, जिल्हा प्रमुख सचिन जाधव यांच्यासह आकाश कावळे, संतोष जगदाळे, ईश्वर शिंदे, महेश केदार तसेच इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान “युवा शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. युवकांच्या स्वाभिमानासाठी युवासेना भविष्यातही रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Post a Comment

0 Comments