तेरणेचा छावा/धाराशिव: – आगामी धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांतून होत आहे. पक्ष संघटन, जनसंपर्क आणि विकासाभिमुख नेतृत्वाच्या जोरावर ते वरिष्ठ सभागृहात प्रभावी प्रतिनिधित्व करू शकतात, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
दत्ता कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले होते. तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद, बूथ पातळीवरील मजबूत संघटन आणि पक्ष वाढीसाठी सातत्याने केलेले काम ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
राजकीय क्षेत्रासोबतच सिद्धिविनायक परिवाराच्या माध्यमातून त्यांनी सहकार, बँकिंग आणि उद्योग क्षेत्रातही मोठे कार्य उभे केले आहे. रोजगार निर्मिती आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विकासाचा दृष्टिकोन कायम ठेवला. स्थानिक पातळीवरील आरोप-प्रत्यारोपांपासून दूर राहत त्यांनी विकासाभिमुख राजकारणावर भर दिला.
0 Comments