Subscribe Us

जमीन विक्रीची दाखवून 2 कोटी 20 लाखाची फसवणूक व जीवे मारण्याची धमकी.येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


                                                  संग्रहचित्र
तेरणेचा छावा/धाराशिव:-
दहिफळ ता.कळंब येथील संदिपान बाबासाहेब मते यांना जमीन विक्रीसाठी निघालेली आहे असे सांगून त्यांना जमीन दाखवून त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 20 लाख रुपये फसवणूक केली पैसे परत मागण्यासाठी गेल्यानंतर शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. 
    याविषयी सविस्तर वृत्त असे की दहिफळ येथील संदिपान बाबासाहेब मते यांना जमीन विक्रीसाठी निघालेली आहे यासाठी दत्तात्रय गोरख कागदे रा. दहिफळ, राजेश नवनाथ अवधूत,सुनंदा नवनाथ अवधूत,गणेश राजेश अवधूत, संगीता राजेश अवधूत सर्व रा. अवधूतवाडी हल्ली मुक्काम भगवंत निवास, घर नंबर 6, सुभाष नगर बार्शी जि.सोलापूर,कैलास शंकर कुटे रा.दहिफळ लता हनुमंत लंगडे, सेनाज हाजु मुलानी रा. गौर यांनी 1 जानेवारी 2024 सकाळी10:00 ते 31 ऑगस्ट 2024 रात्री11:59 पर्यंत विक्रीसाठी जमीन दाखवून 2 कोटी 20 लाख रुपये घेतले परंतु सदर आरोपींनी जमीन खरेदी नावे न करता दुसऱ्याला विक्री केली.खरेदी करणारे यांना फिर्यादी सोबत व्यवहार झाल्याचे माहित असतानाही जमीन खरेदी केली फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ यांची फसवणूक केली.पैसे परत मागण्यासाठी गेले असता गणेश राजेश अवधूत यांनी  शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद 11 एप्रिल 2026 रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 61(2),316(2),352(2) (3)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
    अशाप्रकारे जमीन खरेदी विक्रीसाठी फसवणुकीचे मोठे रॅकेट परिसरात आहे की काय अशी शंका नागरिकातुन व्यक्त होत असून त्याचा पर्दाफाश होणे गरजेचे असल्याचे परिसरातून ऐकावयास येत आहे.

Post a Comment

0 Comments