Subscribe Us

आंदोलनाचा इशारा देताच रस्त्याचे काम लागले मार्गी


तेरणेचा छावा/दहिफळ:-
  दहिफळ येथील चौरस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भातलवंडे वस्ती येथील रखडलेल्या कामासंदर्भात 10 एप्रिल पर्यंत काम न सुरू केल्यास आंदोलनाचा इशारा  माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भातलवंडे व शिवसेना नेते सुरेश मते यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयात 116 ग्रामस्थांच्या सह्यासह निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री सडक योजना कार्यालयातील उपअभियंता एस एस विभुते कनिष्ठ अभियंता एस एस सय्यद ठेकेदार श्रेयस पवार यांनी दहिफळ गावात येऊन ग्रामस्थांची समजूत काढून व रस्त्याचे रखडलेले काम त्वरित दोन ते तीन दिवसात रस्ता सुरू करण्यात येईल याची ग्वाही व लेखी निवेदन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. लागलीच ठेकेदाराकडून रस्त्याच्या दुतर्फा पाणी मारून कामाचा श्री गणेशा करण्यात आला. 
मुख्यमंत्री ग्राम सडक कार्यालयाकडून पत्र स्वीकारताना यावेळी प्रशांत भातलवंडे ,सुरेश मते, पोपट पाटील,भगवान मते,अशोक हावळे, सुधाकर भातलवंडे, बापूराव मते सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments