तेरणेचा छावा /दहिफळ:-
येथील रणरागिनी महिलांनी 23 डिसेंबरला दारूबंदीसाठी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाकडे दोन स्वतंत्र निवेदन देण्यात आली. एका निवेदनात गावात इथून पुढे नवीन बियर बार,डान्सबार व कला केंद्राला परवानगी देण्यात येऊ नये असं होतं तर दुसरं निवेदन गावातील संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी. प्रथमता गावात दारूबंदीसाठी महिलांना जागृत करून ज्योत पेटविण्याचे काम अंजली ढवळे यांनी करत पहिल्या निवेदनाचे नेतृत्व केलं तर दुसऱ्या निवेदनाच नेतृत्व मनीषा मते व कल्पना मते यांनी केले. या निवेदनावर जवळजवळ गावातील 81 महिलांच्या सह्या होत्या यानंतर संपूर्ण गावातील महिला या दारूबंदीच्या कार्यासाठी आक्रमक झाल्या महिला घराघरात जाऊन जनजागृती केल्यामुळे अक्षरशः महिलांची शंभर टक्के एकजूट झाली. महिलांच्या या एकजुटी पुढे व वज्र मोठे मुळे ग्रामपंचायत कार्यालयाकडे आलेल्या निवेदनानुसार ग्रामपंचायत एक जानेवारीला महिलांची ग्रामसभा घेण्यासाठी नियोजन केले.
अक्षरशः अख्ख्या महिला या दारूबंदीत सामील होऊन आपल्या संसाराची राख रांगोळी कशी झाली. गावात दारूबंदी झालीच पाहिजे अशा प्रकारचे शंभर टक्के गावात वातावरण तयार झाले. ग्रामपंचायत कार्यालयाने याआधी दिलेल्या देशी दारू व बियरबार दुकानदाराला साठी महिला ग्रामसभा का घेतली नाही म्हणत ग्रामपंचायतला अक्षरशा शिव्यांची लाखोली वाहिली. महिलांच्या या रुद्र अवतारा पुढे ग्रामपंचायत कार्यालय हतबल झाले. बिअर बार दुकानदारांनाही पुढे येऊन आमचा तुम्हाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. व समर्थनाची कबुली दिली. महिलांची जनजागृती होत होती तसा तसा पाठिंबाही वाढत होता. दहिफळच्या या दारूबंदीच्या जनजागृतीमुळे आसपास परिसरात ही दहिफळ चे नाव गाजू लागले. गावातील व परिसरातील महिलांनाही शंभर टक्के दारूबंदीसाठी पाठिंबा मिळाला होता.
(भाग एक)
0 Comments