Subscribe Us

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा आढावा बैठक, पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन. डॉ.प्रतापसिंह पाटील


तेरणेचा छावा/धाराशिव:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेऊन आगामी धोरणांवर चर्चा करण्यात येणार आहे.
ही बैठक पक्षाचे जिल्हा निरीक्षक मा. श्री रवींद्रजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध फ्रंटल सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सदर आढावा बैठक रविवार, दिनांक २२ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत पक्ष संघटन वाढ, आगामी निवडणुकांची तयारी, तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच फ्रंटल सेलच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments