तेरणेचा छावा/धाराशिव:-
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव व जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या लेडीज क्लब धाराशिव येथे विधी सेवा महा शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा या कार्यक्रमात व्यसनमुक्ती कार्यात सहभाग नोंदवलेल्या दहिफळ ता.कळंब येथील सौ स्वाती भातलवंडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माननीय न्यायमूर्ती श्री शैलेश जी ब्रह्मे ( उच्च न्यायालय मुंबई, औरंगाबाद खंडपीठ) व समाज कल्याण आयुक्त सचिनजी कवले डॉ. संदीप जी तांबारे यांच्या शुभहस्ते व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वाती भातलवंडे या गेल्या चार-पाच वर्षापासून व्यसनमुक्ती क्षेत्रात हिरीरीने भाग घेऊन अनेक व्यसनी व्यक्तींना व्यसनमुक्त करून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. दहिफळ येथील दारूबंदी चळवळीत ही त्यांचा मोठा सहभाग असून त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आल्यामुळे त्यांचे जिल्हाभरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments