तेरणेचा छावा/ धाराशिव:-
कळंब तालुक्यातील गौर येथील उपसरपंच रामेश्वरी लंगडे यांची दिल्ली येथे होणाऱ्या 11 मार्च रोजीच्या राष्ट्रीय परिषदेसाठी निवड
दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्रातून 25 महिला लोकप्रतिनिधींची निवड करण्यात आलेली असून त्यात धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौर येथील उपसरपंच रामेश्वरी लंगडे यांची निवड झालेली आहे.
गावातील ग्रामपंचायत प्रशासन,स्वच्छता,विकासकामे,वृक्षारोपण तसेच राजकीय,समाजिक,शैक्षणिक,महिला बालकल्याण, विद्यार्थी,अपंग,उपेक्षित,वयोवृध्द व जनतेच्या हितासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन सक्षम महिला नेतृत्व म्हणून त्यांची निवड झालेली आहे.
माझ्यासारख्या ग्रामीण भागातील महिलेच्या कार्यकर्तुत्वाची शासनाने दखल घेतल्यामुळे गौरच्या उपसरपंच रामेश्वरी लंगडे यांनी शासनाचे आभार मानले आहे तर राष्ट्रीय परिषदेसाठी जिल्ह्यातून एकमेव महिला लोकप्रतिनिधी निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व स्तरातून व महिला वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments