तेरणेचा छावा/येरमाळा:-
येरमाळा जिल्हा परिषद गट आणि येरमाळा व चोराखळी पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून पक्षाच्या तिकीटासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. येरमाळा गण हा सर्वसाधारण महिलासांठी राखीव असल्यामुळे वेगवेगळ्या पक्षांकडून अनेक महिलांची नावे इच्छुक म्हणून समोर आले आहेत. त्यातच शिवसेना उबाठा पक्षाकडून मेघा जाधव यांनी जोरदार दावेदारी सादर केली आहे.
मेघा पाटील ह्या सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असुन त्यांना सामाजिक, शैक्षणिक, महिलांविषयक प्रश्नांची जाण आहे. ग्रामविकास, स्वच्छता अभियान, महिला बचतगट, तसेच युवतींसाठी कौशल्यविकास उपक्रम अशा क्षेत्रांत कार्य करून महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
मेघा जाधव यांचे पती उमेश जाधव यांनी शिवसेना उबाठा चे युवासेना जिल्हा उपप्रमुख म्हणून काम करीत असताना सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित करून तसेच ज्येष्ठांसाठी संजय गांधी निराधार योजना,विधवा व परितक्त्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देऊन अनेक महिलांनी व्यवसाय चालु केले, पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमीत्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, लोकांना रेशन कार्ड काढून देण्यासाठी प्रयत्न ही कामे प्रामुख्याने केली आहेत. यातून त्यांचे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचे ब्रिद ते अवलंबितात असे दिसते.
उमेश जाधव यांच्या या सर्व कामांचा त्यांच्या पत्नी मेघा जाधव यांना नक्कीच फायदा होताना दिसत आहे. मेघा जाधव यांचाही जनसंपर्क सुरूच आहे. स्थानिक पातळीवर झालेल्या बैठकींना चांगला प्रतिसाद मिळत असून,महिलांसह युवक वर्ग जाधव दांपत्याच्या भोवती एकवटताना दिसत आहे. येरमाळा गणातील अनेक गावांमध्ये जाधव यांच्या प्रबळ दावीदारीमुळे विरोधी पक्षाकडून ही सावध भूमिका घेताना दिसून येत आहे.
विशेष म्हणजे मेघा यांचे माहेर येरमाळा असून सासर उमरा येथील असल्यामुळे अनेक समीकरणे जुळून येताना दिसून येत आहेत.
0 Comments