Subscribe Us

मोहा जिल्हा परिषद गट गण राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार!


तेरणेचा छावा/धाराशिव:-
 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तारीख निश्चित झाली असून 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी असल्याचे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढण्याची मोठी तयारी केली असल्याचे दिसून येत आहे. मोहा जिल्हा परिषद गट हा इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव मोहा पंचायत समिती इतर मागास प्रवर्ग महिला तर गौर पंचायत समिती सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षण निश्चित झालेली आहे. 
  राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोहा जिल्हा परिषद गटासाठी जाहेदा सलीम  मोमीन, मोहा पंचायत समिती गणासाठी मंगल प्रदीप माळी,तर गौर पंचायत समिती गणासाठी प्रशांत भातलवंडे इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोहा जिल्हा परिषद गट व गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जय्यत तयारी केली असल्याचे यावरून दिसून येत आहे. महाविकास आघाडी, महायुती की आणखी काही वेगळी आघाडी अशा वेगवेगळ्या चर्चा असतानाच मोहा जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी राष्ट्रवादीने लढण्याची मोठी तयारी असल्याचे कळंब तालुका राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष अमर मडके यांनी तेरणेचा छावाशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments